विभाजन - 17

  • 5.3k
  • 2.3k

विभाजन (कादंबरी) (17) तो व्हँलेंटाईनचा दिवस होता. सर्वत्र आनंद होता. अशातच बातमी आली की भारताचे वीर सुपुत्र शहीद झाले. त्यामुळे प्रत्येक सैनिकांच्या पत्नीला वाटलं की आपल्या घरचा तर जीव नसावा? त्यांनी फोन बंद करुन ठेवलेले. सर्व श्रद्धांजली अर्पित करण्याच्या मुडमध्ये. कोणी मेसेज टाकून श्रद्धांजली अर्पण केली तर कोणी कविता बनवून. सारेच शोकसागरात बुडाले होते. मा. पंतप्रधानांनी तर इशाराच दिला की आम्ही याचा बदला घेवू. सारा दोष पाकिस्तानवर. पण पाकिस्तान नेहमीसारखा फुशारकी मारत म्हणाला, 'आम्ही हमला केला कशावरुन? आमचा यात काहीही दोष नाही. मग दोष कोणाचा? असंख्य लोकसंख्या असूनही शांतता बाळगणा-या भारताचा की आमच्या राजकारण्यांचा. काहीही कळेनासे. सामान्य माणसाला गुमराह करणारे प्रश्न.