पेरजागढ- एक रहस्य.... - १०

  • 8.8k
  • 3.8k

१०) पवनची आणि इन्स्पेक्टर राठोडची गाठ... मला या गोष्टीची पूर्वकल्पना आलीच नाही.ऑटोतून उतरल्यावर मी सगळ्यात आधी घरी आलो आणि ति थैली व्यवस्थित कपाटात ठेवून आधी आंघोळीला गेलो.मठात विभूतीचा कसला ना कसला अंगारा अंगास येऊन चिकटलेला होता.ज्यामुळे मला कसंतरी वाटायला लागले होते. माझी रूम म्हणजे स्पेशल अशी बाजूला होती.मला विचारल्याशिवाय घरचे सुद्धा त्यात प्रवेश करत नव्हते. आणि माझं अस्तित्व म्हणजे ती माझी खोली असायची.माझं अभ्यास करण्यापासून माझं मनन, चिंतन, शोकसभा त्या रूममध्ये व्हायची.त्यामुळे एकाच घरात दोन तुकडे या प्रमाणे माझं होतं. शिवाय मला बहीण अशी नव्हती ज्यामुळे कोणी मला भावनांची देवाणघेवाण केलं असतं. आई वडील होते पण ते सुद्धा स्वतःच्या