कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .भाग- 30 वा

  • 5.2k
  • 2.2k

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन भाग- ३० वा ------------------------------------------------------------------------- अनुषा ,अभिजित या दोघांचा निरोप घेऊन जळगावकर ऑफिसला गेले. त्यांना अभिजित म्हणाला , काका, तुम्ही कायम मला ऑफिसमधले अपडेट देत जावे , मी आता नियमितपणे बाबांच्या ऑफिसकडे पण लक्ष देईन. माझ्या ऑफिसची मला तशी फार काळजी करण्याची फार गरज नाही , कारण ती काही माझी एकट्याची कंपनी नाही.. माझे इतर पार्टनर सुद्धा माझ्या गैरहजेरीत सगळी कामे पूर्ण करू शकतात . आपल्याकडे तशी सिस्टीम नाहीये ..हे माहिती आहे मला . काम थांबत नाही . पण, बाबांनी फायनल यस म्हटल्या शिवाय ते ओके समजले जात नाही..हे माहिती आहे मला . सध्या आजारी