मैत्री : एक खजिना ... - भाग 24

  • 6.5k
  • 1
  • 2.7k

24... .. .. .. .. .... . .. . . .... .. सानू ऑफिस च कामं संपवून घरी आली खूप जास्त टेन्शन आलं होतं एक मन सांगत होत अभि लगेच तयार होईल तर एक मन म्हणत होतं त्याला हे नाही आवडणार... ती फ्रेश होऊन बाल्कनी मधे येऊन बसली.... फक्त एखाद्या बाहुली सारखी बसून होती ती डोळ्यातलं पाणी तर थांबायचं नाव घेईना.... जणू तिला खूप काही सांगायचं होतं बोलायचं होतं पण त्याचा कोणाला त्रास होऊ नये म्हणून ती आतल्या आतच सहन करत होती तिचं मनच तिला खात होतं हल्ली तर सावी पण तिच्याशी नीट बोलायची नाही तिनी एक दोनदा विचारायचा प्रयत्न केला पण सावी नि काहीच सांगितलं नाही सानू खरंच थकून गेली होती सगळ्यांचे मूड स्विंगस सांभाळून सगळ्यांना समजावून सांगून सगळ्यांना समजून घेऊन ऑफिस च वेगळं टेन्शन अगदी