सौभाग्य व ती! - 24

  • 6.4k
  • 2.7k

२४) सौभाग्य व ती ! जीप खूप वेगाने जात असली तरी नयन मनाने अगोदरच तिथे पोहोचली होती.सारखा तिच्या डोळ्यासमोर संजीवनीचा चेहरा येत होता... क्षणात रूसणारी नि दुसऱ्याच क्षणी हसणारी संजू! लहानपणीच बालपण हरवलेली संजू आणि तासापूर्वीच्या सुंदर हस्ताक्षरातील पत्रातील मजकूर! नोकरी करून नयनला सुखी करू पाहणारी, हरवलेले नयनचे सुख परत मिळवून देवू म्हणणारी संजू...! सारी सारी रूपे नयनच्या डोळ्यासमोरून हलत नव्हती. चौथीवर्गात आणि शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यात प्रथम येणाऱ्या संजीवनीची बुद्धिमत्ता पाहून, तिच्या भविष्याचा विचार करून नयनने तिला दुसऱ्या गावी ठेवण्याचा कठोर निर्णय घेतला. एकदा नयनला वाटले, जवळच ठेवावी. नजरेसमोर शिकवावी पण नंतर पुन्हा मनात विचार येई, की नको. संजू