उकिरडा

  • 15.5k
  • 2
  • 3.7k

उकिरडा रात्री सात आठ वाजताची वेळ आहे. गण्याचं नुकताच जेवण उरकलं होत. त्याची आई त्याच्या बापाला जेवायला वाढत आहे. गण्याचा बाप गावाच्या थोडं लांब असलेल्या तेलाच्या कारखान्यावर काम करतो. सोबत तीन एकराची जमीन आहे पण त्यात जास्त उत्पन्न निघत नसे, म्हणून गण्याची अन त्याच्या बहिणीची फीस भरायला तो कामाला जात होता. अनुला कॉलेजला पाठवायची त्याची लई इच्छा होती. ती पोर आता नववीत आहे. अभ्यासात लई हुशार. दहावी नंतर शिकवायला तो आतापासूनच पैसं जमा करत होता. अन त्याच्या उलटं गण्या यावर्षी आता मॅट्रीक पास होईल का नाही याची बापाला गॅरंटी नव्हती. अभ्यासात तसा कच्चा पण बापाच्या हट्टापायी दहावी पास होऊन