गुंतता हृदय हे!! (भाग ७)

(13)
  • 7k
  • 1
  • 3.2k

शेखरने आर्याला त्याच्या केबिनमध्ये बोलविले आणि तिला समीरबद्दल विचारले. पण आर्याने तिला ह्याबद्दल काहीच माहीत नाही हे सांगितले.. शेखरला आर्याच्या एकंदरीत वागण्यावरून थोडा संशय आला होता की, नक्कीच या दोघांमध्ये काहीतरी बिनसलयं म्हणूनचं समीरने नोकरी सोडण्याचा तडकाफडकी निर्णय घेतला असेल.. तरी शेखरने आर्याला समीरच्या नोकरी सोडण्याबाबत काहीच कळू दिले नाही..कारण इतक्यात त्याला हे ऑफिसमध्ये कोणालाही कळू द्यायचे नव्हते.. आर्या तिच्या डेस्कजवळ आली आणि विचार करू लागली, "हा समीर नक्की कुठे गेलाय? आणि हा शेखर त्याच्याबद्दल मला का विचारत होता? समीरने शेखरला त्याला माझ्याबद्दल वाटणाऱ्या भावना सांगितल्या असतील का? शीट यार. हा समीर पण ना..देव करो तो ठीक असू देत" आर्या