कादंबरी- जिवलगा ..भाग -४४ वा

  • 11.4k
  • 5.8k

कादंबरी – जिवलगा भाग -४४ वा --------------------------------------- नेहा ,सोनिया आणि अनिता ..रोजच्या प्रमाणे ऑफिसला आलेल्या होत्या ,सोबत यायचे आणि सोबत जायचे असे रुटीन ठरलेले , हेमूच्या ऑफिसमध्ये ट्रान्स्फर झाल्यापासून तिघींची लंचला पण भेट होत नसे , त्यामुळे वेळ मिळेल त्या प्रमाणे लंच घेऊन पुन्हा डेस्कवर जाणे सोयीचे वाटू लागले होते . आजच्या लंचसाठी सोनिया आणि अनिता दोघीच होत्या ,लंच टेबलवर डबे उघडून सुरु करतांना ..सोनियाच्या फोनची रिंग वाजली .. हे ओफिस्वाले लंच सुद्धा शांतपणे खाऊ देत नाहीत ...! असे म्हणत तिने फोन हातात घेतला स्क्रीनवर मधुरिमादिदीचा नम्बर दिसत होता .. अनिता म्हणाली .. सोनिया ..काय असेल matter ? दीदीने फोन