विभाजन - 15

  • 5.4k
  • 2.2k

विभाजन (कादंबरी) (15) युसूफ काश्मीर बाबत विचार करीत असतांना त्याला अचानक तो शाळेत वाचन केलेला काश्मीरचा इतिहास आठवला. तसा त्याला विचार आला. काश्मीर मुद्दा हा वादाचाच मुद्दा आहे. नेहमी तिथे रक्त सांडत असतं. सर्वात पहिलं रक्त रणजीत सिंगच्या रुपानं सांडलं ह्याला इतिहास साक्षी आहे. त्यानंतर शर्माचं रक्त. आम्ही काश्मीर जिंकलो होतो. पण तो जिंकलेला भाग आम्ही दिलखुलासपणे सोडून दिला. याचं कारणही तसंच होतं. आमच्या तत्कालीन नेत्यांना वाटत होतं की जर का हा भाग घेतला तर ती आमच्यासाठी डोकेदुखी ठरेल. तो भाग आम्ही आम्हाला डोकेदुखी ठरेल म्हणून सोडून दिला. त्यातच आमचं चुकलं. याचं कारण असं की तो भाग आम्ही सोडल्यानं त्या