दुपारचे बारा वाजले होते. इतक्या दिवसाढवळ्या देखील रस्त्यावर शुकशूकाट होता. सरकारने लॉकडाउन घोषित करून आठवडा उलटला होता. एवढ्या तप्त उन्हात देखील चंदा तशीच उभी होती. कुणीतरी येईल या आशेवर. कुणीच येणार नाही हे तिलादेखील माहिती होते पण तिला पर्याय नव्हता. सडपातळ बांध्याची चंदा केसांच्या सोडलेल्या एका बटेशी उगाचच चाळा करत होती. सकाळपासून केलेला शृंगार आता घामामुळे पुसला गेला होता. तिच्या पोटाच्या खळगीपेक्षा तिच्या आई आणि आजीचे पोट भरण्यसाठी ती जगत होती. तिची आई तिला कुंटणखाण्यात सोडून गेली तेव्हा ती अवघी वीस वर्षांची होती. तिचे मुळ गाव दूर महाराष्ट्र-कर्नाटकाच्या सीमेवर कुठेतरी होते. आईचे वय झाले म्हणून आईच्या बदली दिदीने