भक्त आपल्या भगवंताकडे आपल्या मोक्षाची प्रार्थना करत असताना, त्यांची कोणती इच्छा असते ते काही शब्दात वर्णन करून सांगतात की..हे भगवंता माझ्यासाठी फक्त एवढेच करा की, ज्यावेळेस माझा आत्मा या शरिरातून जाईल, त्यावेळेस मी तुमचं नाव घेऊन मगच माझा देहत्याग करू इच्छितो...पवित्र गंगेच्याकाठावर किंवा यमुना नदीच्या वाटेवर फक्त तुम्ही माझ्या जवळ असा...पवित्र असे वृन्दावन स्थळ असो आणि माझ्या तोंडात तुळशीपत्र असो आणि तुमच् चरनोदक पाणी असो...तुमच्या डोक्यावर मुकुट असो आणि चेहऱ्यावर कुरळ्या केसांची काली बट असो..आणि असंच मला तुमच्या मुखाकडे पाहता पाहता मरण यावी..तुम्ही समोर उभे असावी ..तुमच्या हातात मुरली असावी.. पाय तुमचा वाकडा असावा आणि तुमच्या मुरली तून मधुर स्वर