'गर्लफ्रेन्ड' म्हटलं कि, प्रत्येकाला आपली प्रेयसी डोळ्यांसमोर दिसते आणि ज्याला गर्लफ्रेन्डच नसेल, त्याला आपल्या मित्राची प्रेयसी डोळ्यांसमोर दिसते. काय मग... अगदी मनातलं ओळखलं ना ? असो !!! गर्लफ्रेन्डबद्दल तर आपल्या सर्वांना माहित आहे. पण 'हाल्फ गर्लफ्रेन्ड' ही संकल्पना ऐकली कि, बरेच लोक बुचकळ्यात पडतात. खरंतर या संकल्पनेबद्दल आपल्या देशात फारच कमी लोकांना माहित होते. २०१४ मध्ये, सुप्रसिद्ध भारतीय लेखक चेतन भगत यांनी 'हाल्फ गर्लफ्रेन्ड' ही कादंबरी प्रकाशित केली त्यानंतर ही संकल्पना काही लोकांपर्यंत पोहचली होती. नंतर २०१७ मध्ये अर्जुन कपूर आणि श्रद्धा कपूर यांचा "हाल्फ गर्लफ्रेन्ड" हा चित्रपट प्रकाशित झाला तेव्हा अनेक लोकांना प्रश्न पडला होता कि, 'हाल्फ गर्लफ्रेन्ड' म्हणजे