भाग दोन - आनंदाचा क्षण दवाखान्यातुन आजी आम्हांला तिघींना घेऊन तिच्याच घरी आली. मोठी बहिण म्हणजेच ताई आता जवळ जवळ सात वर्षांची होत आली होती आणि दोन नंबर बहीण म्हणजेच माई ती देखिल पाच वर्षाची होत आली होती. मी मात्र नुकतीच जन्मलेली होती आणि माझ्याच जन्मामुळे ..माझी आई आम्हांला तिघींना सोडुन गेली आहे, हे देखिल मला कळणार नव्हते. ताईला मात्र सर्व समजत होते, माईला ही समोर घडणा-या घटनांची थोडी थोडी जाणिव होत असावी. त्या वयात त्यांना स्वतःची नावे देखिल व्यवस्थित सांगता येत नव्हती, त्यावेळी त्या तरी काय करणार होत्या??? आजीच्या घरी आम्ही तिघी आणि मामा राहत होतो. मामा गावाबाहेर एका कारखान्यात