सौभाग्य व ती! - 21

  • 6.9k
  • 2.9k

२१) सौभाग्य व ती ! "काय ताई, संजीवनी गेली का?" नयन नेहमीप्रमाणे शाळेत पोहचताच गायतोंडेनी विचारले. "हो भाऊ. तिला सकाळच्या बसमध्ये बसवून दिले." "ताई, संजीवनीच्या बाबतीत मात्र तुम्ही चांगला निर्णय घेतलात." "काय करू भाऊ, एक वेळेस वाटले, आपली मुलगी आपल्या हातांनी घडवावी परंतु तिच्या भावनांचा कोंडमारा होऊ लागला. मन मारून तिला घरात राहावे लागे. कधी कुणाचे कौतुकाचे चार शब्द नाहीत. पाठीवर शाबासकीची थाप मिळण्याऐवजी रट्टा मात्र मिळत असे." "संजीवनीची ती शाळा आणि वसतिगृह नावाजलेले आहे. तिथे तिच्या