कादंबरी - प्रेमाची जादू भाग -११ वा

  • 9.4k
  • 4.2k

कादंबरी – प्रेमाची जादू भाग- ११ वा ------------------------------------------------------------------------ यशच्या आई हॉलमधून बाहेर पाहत होत्या , गेट उघडून आत येणार्या मधुराकडे त्यांची नजर गेली .ही मुलगी अगदी साधी आहे हे तिच्याकडे पाहूनच त्यांना कळत होते, आत आलेल्या मधुराच्या हातातल्या परडीत ..खाली बागेतून वेचून आणलेली फुले होती . आजीने तिचे स्वागत करीत म्हटले .. ये मधुरा ये , तुझे स्वागत आहे आमच्या घरात . सगळ्यांकडे पाहत आजोबा म्हणाले .. मला ही वाटले की- आपण ही आपल्या एका पाहुण्याला बोलवावे ,आपला रविवार सुटीचा दिवस छान नवे विषय आणि नव्या गप्पा करण्यात जाईल . आणि माझ्या मनात आले की -..ही मधुरा आली म्हणजे अंजलीलासुद्धा