सौभाग्य व ती! - 20

  • 7.1k
  • 1
  • 2.8k

२०) सौभाग्य व ती! "अभिनंदन, ताई! आपण बी. एड. पास झालो..." आत आलेले गायतोंडे म्हणाले. "काय सांगता?" "होय. नयनताई, तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. कारण ज्या परिस्थितीत सध्या तुम्ही आहात त्या स्थितीमध्ये शाळेचे काम सांभाळून, प्रचंड, मानसिक तणावामध्ये तुम्ही जे यश मिळवलंय ना त्याला खरेच तोड नाही. तुमचा आदर्श..." "माझा आदर्श? भाऊ, अहो जिथे कौतुकाच्या चार शब्दांची वाणवा आहे तिथे तुम्ही माझ्या आदर्शाची भाषा करता? भाऊ कधी वाळवंटात का भाताचे पीक येणार आहे?" "खरे आहे तुमचे. ताई, स्वार्थाने डबडबलेल्याया जगामध्ये कौतुक,