कादंबरी- जिवलगा ...४३ वा

(11)
  • 13.8k
  • 1
  • 6.1k

कादंबरी – जिवलगा भाग – ४३ वा ------------------------------------------------------------------ नेहाच्या घरी सध्या काय चालू आहे ते पाहू या ... नेहाचे बाबा ..ज्यांना .” मोठे वकीलसाहेब या नावानेच बोलतात सारेजण , आणि नेहाचा भूषण दादू त्याला “छोटे वकीलसाहेब “असे म्हणतात . गेली सात-आठ वर्षे पासून मोठे वकीलसाहेब कोर्टात हजेरी लावयची म्हणून जाऊन येत असतात ,लोकांना असे वाटू नये ..की मोठे वकील साहेब आता काही कामकाज करीत नाहीत . गावाकडच्या वातवरणात जे समोर असते त्यालाच लोक पाहत असतात . नेहाचे आजोबा ,ते देखील वकील होते ,त्यांच्या जमान्यातील खूप मोठे आणि यशस्वी वकील म्हणून त्यांचा नावलौकिक होता.आणि त्यांच्यापासूनच नेहाच्या परिवारात वकील होऊन गावातच ,फार