कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .भाग- २८ वा

  • 6k
  • 2.2k

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन भाग – २८ वा ----------------------------------------------------------- १. हॉस्पिटलमध्ये अविनाश जळगावकर काकांची भेट आणि त्यांनी सांगितलेली बातमी ऐकून अनुशाला खूपच आनंद झाला होता . त्याच आनंदात ती घरी आली , आणि तिने लगेच रंजनादीदीला फोन लावला . हेल्लो दीदी ..अनुषा बोलते आहे , वेळ आहे ना ? बोलायचे आहे .सांगायचे आहे तुम्हाला .. अनुशाच्या आवाजातील अधीरता दीदीला जाणवली ..आणि अंदाज आला काही तरी महत्वाचे आणि छान असेच सांगायची घाई या मुलीला झाली आहे..! हो अनुषा ..वेळ आहे मला..तू बोल .. दीदी..तशी तर ही बातमी सिरीयस आहे ..पण..याचा नंतरचा भाग खूप आनंदाचा आहे.. दीदी म्हणाल्या ..अनुषा ,उगीच