फिरकी

(12)
  • 8.4k
  • 1
  • 3.1k

"राशी....राशी.... अग चहा झाली का..?? अंशला दे माझ्याकडे.... त्याला घेऊन सगळी कामे करतेस.. रिकामाच बसलोय मी.. दे बर त्याला माझ्याकडे...."सुभाषराव हॉलमधील सोफ्यावर बसत म्हणाले... "आले बाबा... हा घ्या तुमचा चहा.. आणि हा तुमचा अंश.. खूप मस्ती करतोय बर आजकाल आणि चिडचिडही..एका मिनिटासाठीही सोडत नाही बाबा हा मला.. मग त्याला घेऊनच सगळी कामे करावी लागतात.. तुम्हालाही किती त्रास देतो हा.. " छोट्याश्या अंशला राशीने सुभाषरावच्या बाजूला बसवत म्हणाली.. "अग.. चालायचंच ते.. दात येत आहे बाळराजेना..थोडी चिडचिड करणारच तो.. तुझा अभयही (सुभाषरावाचा मुलगा ) असाच त्रास द्यायचा त्याच्या आईला.. आज सुनंदा(अभय ची आई )असती तर तुला थोडासा आराम मिळाला असता...आवडीने केल असत आपल्या