लॉकडाउन - खंडोबा उवाच - भाग ८

  • 6.8k
  • 2.5k

सायंकाळची तिरपी किरणे गडावर पडली होती. वैशाख महिन्याचे उष्ण वारे मंद गतीने वहात होते. त्यामुळे झाडाच्या पानांची सळसळ ऐकू येत होती. पिकलेली पाने त्यामुळे गळून पडत होती. कधीच परत न येण्यासाठी. स्वतःहून झाडाशी आपला सबंध तोडत होती. आपण पिकलो, पिवळे झालो, आपला कार्यभाग संपला असे वाटताच ती गळून पडत होती. गडावरुन जवळची झाडे मोठी दिसत होती आणि दूरची झाडे त्या गळून पाडलेल्या पानांसारखी. दुरूनच कुठेतरी पक्ष्यांचा थवा उडत होता. दुसर्‍या दिवसाचे अन्न शोधण्यासाठी. आज एका झाडावर, उद्या दुसर्‍या मग परवा तिसर्‍या, अशी त्यांची भटकंती आयुष्यभर सुरूच असते. ते एका जागेशी मोह ठेवत नाहीत. त्यामुळेच कदाचित इतके स्वाच्छंदपणे उडू शकत असावेत