गोट्या - भाग ५

  • 10.8k
  • 1
  • 3.8k

गोट्याचे शिक्षक होण्याचे स्वप्नबारावीची परीक्षा दिल्यानंतर गोट्या आपल्या गावी परत आला. दोन वर्षे शहरात राहिल्याने त्याचे राहणीमान पूर्ण बदलून गेले होते. तो सहसा घराबाहेर पडत नव्हता. घरातील जुने वृत्तपत, पुस्तके, मासिके वाचत होता. दुपारच्या वेळी रेडिओवर विविधभारती लावून हिंदी गाणे ऐकण्याचा काम करायचा. सायंकाळच्या वेळी तळ्याच्या काठावर मित्रांसंगे फिरायला जात असे. असा त्याचा दिनक्रम चालू होता. बारावी पास झाल्यावर काय शिकावं याबाबत तो काही ठरवू शकत नव्हता. कारण मार्क कसे मिळतात ? यावरच त्याचे भविष्य अवलंबून होते. मार्क कसे ही मिळो त्याच्या सोबत शिकत असलेले सारेचजण इंजिनिअरिंग करण्याचा ठाम निर्धार केला होता. अखेर निकालाचा दिवस उजाडला. प्रेसच्या कार्यालयात एका रूपायाला