पेरजागढ- एक रहस्य.... - ८

  • 10.1k
  • 4.8k

८)नमनची भेट.... साधु महाराजांशी बोलून झाल्यावर, माझ्या मनाची पूर्तता झाली होती.नकळत त्यांनी मला खूप काही सांगितले होते.अस्तित्वाचा पुरावा हा मला त्यांनी डोळ्यादेखत दिला होता. ज्यामुळे सत्य आणि सत्व यामध्ये काय अंतर आहे हे मी जाणू शकलो.गावाकडे परतल्यावर माझ्यावर थोडाफार झालेला बदल सगळ्यांनी अचूक हेरला होता.पण नेमकं काय झालं?अशी विचारणारी फक्त रितू होती. त्यादिवशी कुठेतरी जायला निघालो होतो, की दरवाज्यात तिचे पाऊल पडले.काय मालक कुठे चालले? तिचा पहिलाच प्रश्न. अगं कुठे नाही.... मला नमनचा शोध घ्यायचा आहे ना... त्याच्यासाठी सोशल मीडियावर काहीतरी प्रयत्न करतो. अच्छा..... प्रवास कसा झाला? काही मनासारखे घडले ना!!! की काही अजून विपरीतच होणार.भेटला काय तो माणूस?