कादंबरी - प्रेमाची जादू - भाग - १० वा

  • 9.2k
  • 4.2k

कादंबरी – प्रेमाची जादू भाग- १० वा ------------------------------------ रविवारची सुट्टी ,उगवणारी सकाळ सगळ्यांना खूप छान वाटणारी असते , आठवडाभर ऑफिस एके ऑफिस करणार्यांना ,एक तर आराम करायचा असतो किंवा ..पेंडिंग कामे अगदी निपटून टाकीत मनावरचे ओझे कमी करायचे असते . थोडक्यात काय तर, जो तो आपल्या आपल्या मनाप्रमाणे रविवारच्या सुट्टीचा आनंद घेणार असतो. आजचा रविवार ..यशच्या फामिलीसाठी तर खूपच बिझी असणारा आहे.. आज पहिल्यांदा त्यांच्या घरी -यशला भेटायला म्हणून ..सगळ्या परिवारासोबत राहायला मिळावे म्हणून एक मुलगी –पाहुणी म्हणून येणार ..त्यामुळे सगळेजण तिच्या येण्याची वाट पाहत होते. तसे तर सकाळचे कोवळे –उबदार ऊन, बागेत खुर्च्या टाकून ..पेपर वाचीत चहा