गुंतता हृदय हे !! (भाग ३)

  • 9.8k
  • 4.2k

चक्क आर्या आपल्याशी बोलत आहे याचा आधी समीरला विश्वासच बसत नव्हता..पण त्याने स्वतःला सावरलं.. आणि म्हणाला, "अगं, आज एका क्लायंट बरोबर मीटिंग आहे..म्हणून थोड्या तयारी साठी लवकर आलो..जाईन आता ५-१० मिनिटात." तो पुढे म्हणाला,"आज कधी नवे ते, तू पण तर लवकर आलीयेस. काही खास कारण? तुझी पण मीटिंग वगैरे??" "तसे काही नाही. Anywy you carry on. मी निघते..मला भरपूर काम आहे..पुन्हा बोलू bye" असे बोलून आर्या कँटीन मधून निघून गेली.. आजचा दिवस रोजच्यापेक्षा खूपच बोर होता स्निग्धा नव्हती ना!! ती असली की, नेहमी ऑफिसमध्ये आवाज,गोंधळ असायचाच.. तोपर्यंत दुपार ही झाली..तिला लंच एकट्याने करायलाही बोरं झालं होतं. पण भूक पण लागली