स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 19 )

(23)
  • 9.5k
  • 4.4k

ना दुवाओ का असर है ना है गीडगीडाने का फायदा तकलिफे अब जिंदगी बन गयी फिर क्यो रखे कोई इरादा ... बाबांच्या जळत्या चितेकडे नित्या पाहत म्हणाली , " बाबा नक्की दोष कुणाचा ? ..त्या पुरुषाचा जो एका मुलीला जन्म घालताना तिच्याबद्दल कुठलाही विचार करत नाही की त्या मुलीचा जी आपल्या वडिलांचा शब्द आयुष्यभर पाळते ..दोष नक्की कुणाचा ? जो वडील आपल्या आनंदासाठी मुलीला जन्माला घालतो की त्या मुलीचा जी आयुष्यभर पुरुषांच्या चार भिंतीत कैद होऊन जीवन जगते ..दोष कुणाचा ? त्या नवऱ्याचा जो घाणेरडे आरोप लावून एका मुलीला रात्रीला घराबाहेर काढतो , त्या वडिलांचा जे आपल्या मुलीने बाहेर