सौभाग्य व ती! - 17

  • 6.6k
  • 2
  • 2.8k

१७) सौभाग्य व ती ! दूर कुठेतरी कोकिळेचा मधुर स्वर ऐकू आला. आळस देत बाळू ऊठला. परंतु अंगातलाआळस जात नव्हता, उत्साह येत नव्हता. कदाचित त्याच्या मनावर असलेला ताण त्याचा उत्साह हिरावत होता. तितक्यात विठाबाई लगबगीने आत आली. तिला पाहताच बाळूने विचारले, "का ग विठा, काय झाले?" "काकासाब, लई बेक्कार झालं?" विठाबाईचा घाबरलेला स्वर ऐकून बाहेर आलेल्या मीनाने विचारले, "विठा, काय झालं गं?" "अव्हो, वाड्यात तायसाब न्हाईत व्हो..." "घरात नाहीत? अग जाणार कुठे? नीट बघ..." "बाळासाब, सम्दा वाडा फायला. आजपस्तोर