विभाजन - 8

  • 6.9k
  • 2.2k

विभाजन (कादंबरी) (8) मोहम्मदने भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात घेतलेली उडी गावच्या लोकांना आवडली होती. प्रत्येक गावन् गाव स्वातंत्र्याच्या ध्येयानं पछाडलेलं होतं. ते ब्रिटीशांना जुमानत नव्हतं. त्यांना देशातील लोक आवडत होते. नव्हे तर जेही स्वातंत्र्यासाठी झिजत होते. त्यांना गावची लोकं मदत करीत असत. मोहम्मदनं तोडलेल्या टेलिफोनच्या तारा.... हा प्रकार ब्रिटीशांसाठी लांच्छनास्पद असला तरी गावासाठी गावचा अभिमान बाळगणाराच होता. म्हणून की काय अख्ख गाव त्याच्या धर्माचा बाऊ न करता त्याला आपल्या घरात लपवीत होते. त्याच्यासाठी प्रसंगी पोलिसांचा लाठीमार खात होते. मोहम्मद काही पोलिसांच्या हाती लागला नाही. पोलिसांनी बराच प्रयत्न केला. त्यावेळी तर मोहम्मदला गावच्या लोकांबद्दल आत्मीयता निर्माण झाली होती. हिंदू महासभेची दोन राष्ट्राची कल्पना