कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .भाग- २७ वा

  • 6.8k
  • 2.5k

कादंबरी –प्रेमाविण व्यर्थ हे जीवन भाग- २७ वा -------------------------------------------------------------------- १. देशमुखसरांना हॉस्पिटल मध्ये दाखल करून आज आठ दिवस झाले होते .. त्यांच्या आयुष्याची दोरी बळकट आहे असेच सगळ्यांना वाटत होते ..त्यामुळेच तर ब्रेन स्ट्रोक होऊन देखील ..त्यांच्या हृदयाला इजा पोंचली नाही , की स्मरणशक्तीला ..धक्का नाही. त्यांना डायबेटीस नाही, बीपीचा त्रास नाहीये .. पेशंटची कंडीशन पाहून डॉक्टरांनी खूप समाधान व्यक्त करीत बोलून दाखवले की – खरोखर नशीबवान आहेत देशमुखसर . सहीसालामात सुटले एका जीवघेण्या संकटातून . नाही तर ..काही काही पेशंट इतके दुर्दैवी असतात की त्यंची नंतर होणारी हलत बघवत नाही ..त्यांच्या मनाने हे तसे काहीच नाही .. हे सगळे