गोट्या - भाग 2

  • 15k
  • 1
  • 4.2k

एक दोन वर्षानंतर गावातच एकाने टीव्ही आणली मग गोट्याचे बाहेरगावी बघायला जाणे बंद झाले. मात्र शाळा बुडवून फिल्म बघण्याचा सपाटा चालू झाला. या शाळेत मात्र एक कडक शिस्त होती. रोज दोन वेळा हजरी व्हायची. गैरहजर असलं की दुसऱ्या दिवशी हातावर छडी पडायची. रोज वही पूर्ण करणे, शब्द पाठ करणे, शुद्धलेखन लिहिणे ही कामे करावे लागत असे त्यामुळे त्याला गोट्या खेळायला खूपच कमी वेळ मिळत असे. तरी देखील तो गोट्या खेळणे सोडत नसे. रिंगणात सर्व गोट्या टाकायचे आणि सांगितलेली गोटी उडवायची, एक खोल गड्डा करायचा त्यास गल म्हणायचे, रेषेच्या आत सर्व गोट्या टाकायचे, गलीत जर गोटी पडली तर तीन वेळा मारण्याची