सौभाग्य व ती! - 16

(13)
  • 7k
  • 3k

१६) सौभाग्य व ती ! सकाळी पुरते फटफटलेही नव्हते तरीही विठाबाईने लगबगीने वाड्यात प्रवेश केला. रात्री सदाचे आणि नयनचे भांडण सुरू असताना सदाने तिला वाड्याबाहेर काढल्यापासून तिचे चित्त थाऱ्यावर नव्हते. रात्रभर झोपही लागली नव्हती. एखादेवेळी थोडी डुलकी लागली न लागली की तिला खडबडून जाग येत होती. 'काय झाल असेल? मालकाने लई मारल असल का? काही इपरित तर बघायला मिळणार नाही ना?' अशा विचारा विचारात तिने वाड्यात प्रवेश केला आणि चुलीपुढे बसलेली नयन पाहून तिचा जीव भांड्यात पडला. तिने विचारले, "तायसाब,