गोट्या - भाग 1

  • 21.4k
  • 1
  • 8.4k

आज दूरदर्शनवरील पुनः प्रक्षेपित होत असलेले रामायण मालिका पाहतांना गोट्याला म्हणजे सोहमला त्याचे 20-25 वर्षापूर्वीचे बालपण आठवून गेले. कोरोना विषाणूमुळे संपूर्ण भारतात लॉकडाऊन झाले होते. कोणीही घराबाहेर पडू नये, घरातच सुरक्षित राहावे म्हणून सरकारने सक्तीचे आदेश काढले. घरात बसून बसून लोकांना कंटाळा येऊ नये म्हणून सरकारने पुनश्च एकदा जुनी मालिका रामायण दाखविण्यास प्रारंभ केले होते. आज ती रामायण मालिका पाहतांना गोट्याला ती मजा येत नव्हती, जी मजा त्याने लहानपणी अनुभवली. तो आपल्या भूतकाळात रमला. खरं तर त्याचे नाव सोहम होते पण घरात, दारात, गल्लीत सर्वत्र तो गोट्या या नावानेच प्रसिद्ध होता. त्याला कारण ही तसेच होते. सोहम अगदी लहान म्हणजे शाळेत