गुंतता हृदय हे!! (भाग २)

(11)
  • 10.1k
  • 4.8k

"अनिश ह्या साठे काकू आणि या जोशी काकू व ही त्यांची मुलगी आर्या', गोडबोले काकू म्हणाल्या. अनिश ने दोन्ही काकूंना नमस्कार केला आणि आर्याला हॅलो म्हटले. आर्या ची नजर अनिश वरून हटतच नव्हती.. इतक्यात जोशी काकू म्हणाल्या, "अरे, रेडिओवर म्हणजे तू RJ अमेय ला ओळखत असशील ना? " "मी न चुकता त्याचा प्रोग्राम ऐकते..कोणता ग तो आर्या? हा "गुंतता हृदय हे", किती सुंदर असतो प्रोग्रॅम!! त्यातली मराठी गाणी तर खूपच सुंदर आणि त्याचा आवाज तर!!" काकूंना मध्येच थांबवत आर्या म्हणाली, " आई!! पुरे झाले त्या अमेयचं कौतुक". इतक्यात साठे काकू म्हणाल्या," मी पण ऐकते तो प्रोग्राम..फारच छान आवाज आहे हो