चोरी

  • 7.2k
  • 1
  • 2.4k

संजय दहा बारा वर्षाचा पोरगा. त्याचे बाबा शहरात मिळेल ते काम करून आपला संसार चालवत होता. त्याला सुरेश आणि विमला नावाची एक मुलगी होती. संजय आई देखील मिळेल ते काम करून पोट भरायचे. विमला आणि संजय एकाच शाळेत शिकत होती. तो पाचव्या वर्गात तर विमला पहिल्या वर्गात शिकत होती. आपली मुलंसगीकून मोठी व्हावीत, आमच्यासारखं त्यांना कष्ट सोसायला नको म्हणून ते त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देत होती. ते दोघे एकही दिवस शाळा बुडवत नसत. मात्र संजयला एक वाईट सवय होती. लहानपणापासूनच तो घरात देखील आई बाबांच्या नकळत पैसे चोरायचा. आता लहान आहे म्हणून एक दोन वेळा त्याला समज देऊन सोडून देण्यात आले.