संजीवन

  • 6.4k
  • 2k

' स्वीट जंक्शन ' मधून केशरी पेढ्यांचा बाॕक्स घेतला आणि आभा शिरीन मॕमकडे निघाली. नंदिता प्रशांत तिला थेट दादर स्टेशनवर भेटणार होते. तिथून सिंहगड एक्सप्रेसने ते चौघेही पुण्यातल्या प्रयोगासाठी निघाले होते. जायच्या आधी मॕमना भेटून आशिर्वाद घेणं तिच्यासाठी महत्वाचं होतं. मॕमच्या क्लिनीकमधे येऊन ती बसली. आतमधे कोणी क्लायंट होता. आता कमीत कमी चाळीस मिनीटांची निश्चिंती. ती बाहेरच्या वेटींग हाॕलमधे वाट पहात बसली. वर्षभरापूर्वी आपणही तर त्यांच्या क्लायंटच होतो की, तिच्या मनात विचार आला. मागे वळून पाहीलं तर या वर्षात आपले पाय चांगलेच स्थिरावलेत. याचं पूर्ण श्रेय मात्र तिला शिरीन मॕमनाच द्यायचं होतं. त्यांनी सावरले नसते तर निराशेच्या खोल गर्तेत आपण