लेडीज ओन्ली - 5

  • 7.6k
  • 2.8k

|| लेडीज ओन्ली ||(भाग - 5) या दोन बायांच्या राजकीय वाद संवादाच्या दरम्यानच्या वेळात राधाबाईंची भांडी धुवून घासून पुसून फळीवर लावून झाली होती. आता त्यांनी फरशी पुसण्याकडे आपला मोर्चा वळवला. विजयाताई अजूनही राजकारणाचाच विचार करत बसलेल्या होत्या. आणि एकदमच काहीतरी त्यांच्या लक्षात आलं अन् त्यांनी राधाबाईंशी एका वेगळ्याच विषयावर बोलायला सुरुवात केली, " राधाबाई, तुमचं नावही याच वॉर्डात आहे ना मतदानासाठी?" "आं? ठाव न्हाई... वारड फिरड कळत न्हाई आमास्नी... " ओलं केलेलं फडकं फरशीवर फिरवत त्या उत्तरल्या. " अहो मग मतदान कसं करता तुम्ही? " " कसं मीन्स... असंच खटका दाबून.. "" आणि कोणाचा खटका दाबायचा ते कसं