कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन भाग - 26 वा ------------------------------------------------------------------------- अभिजितला सकाळी सकाळी त्याच्या अजयजीजू आणि रंजनादिदीचा फोन येऊन गेला .. त्यांच्याशी बोलून झाल्यावर ..त्याच्या मनात विचार येत होते की.. या अनुशाला मानलेच पाहिजे ..किती दूरवरचा विचार करून ,केवळ आपल्यावरच्या प्रेमापोटी ती स्वतःची ओळख लपवते आहे . यामागे तिचा एकच उद्देश आहे आणि तो म्हणजे आपले बाबा आणि त्यांचा iपरिवार हे सारे पुन्हा नव्याने जोडले जावेत. आपल्या बाबांच्या मनातील जिव्हाळ्याची ,प्रेमाची भावना पार आटून गेलेली आहे ..हा लुप्त झालेला भावना -प्रवाह सुरु व्हावा .आणि आपल्या बाबांना जाणीव व्हावी की.. माणसाचे लौकिक जीवन कितीही संपन्न असू दे. त्यात प्रेमाचा