१३) सौभाग्य व ती! रस्त्याच्या दुतर्फा प्रकाशणाऱ्या लाईटच्या गोळ्यांमुळे ती नगरी झगमगून निघाली होती. मध्यरात्रीची वेळ. सर्व दुकाने बंद झालेली. क्वचित एखादा माणूस किंवा एखादं वाहन रस्त्यावरून जाताना वातावरणातील शांतता भग करीत होते. तशा वातावरणाशी, त्या रात्रीशी आणि त्या नगराशीही काही घेणेदेणे नसलेली, जीवाची मुंबई करण्यासाठी त्या हॉटेलमध्ये चाललेली पार्टी उन्मादाच्या अत्युच्च शिखरावर होती. महाविद्यालयीन युवक-युवती त्या पार्टीच्या मदहोशीला बळी पडलेले स्पष्ट दिसत होते. त्या उन्मत्त वातावरणाशी बळी पडणाऱ्या युवक युवतींना पार्टीसाठी विशेष असं कारणही लागत नाही.