लॉकडाउन - दुर्मिळ प्रेतयात्रा - भाग ३

  • 6.3k
  • 2.7k

“आला कारे मेल?” “नाही अजून.” “आणि काही टेंशन नको घेऊस. निगेटिव्ह येईल.” “मी नाही घेत रे टेंशन, मी तरुण आहे. मला नाही काही होणार.” “मग कशाचा विचार करतोयस मघापासून?” “काही नाही, बाबांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला म्हणजे झालं. त्यांचंच टेंशन आहे.” “नको काळजी करू, होईल सर्व ठीक.” “पण मी काय म्हणतो, काही गरज नव्हती ना बाहेर जायची. त्या फळ विक्रेत्याकडे किती लोकं येत असतील दिवसभरातून. मी बघितले आहे त्याला. तसाच बसलेला असतो लोटगाडीवर. विनामास्कचा, सैनीटायझर तर हा प्रकार काय आहे हे त्याला ठाऊक आहे की नाही काय माहीत. इतके निष्काळजी कसे होऊ शकतात