करामती नाम्या

  • 4.6k
  • 1.7k

हरिपूर नावाच्या गावात राधा आणि किशन मोलमजुरी करून आपले जीवन जगत होते. त्यांच्या परिवारात आजपर्यंत मुलगी जन्माला आलीच नाही. यांनी देखील मुलगी व्हावी म्हणून सहा मुलांना जन्म दिले. राधा सातव्यांदा गरोदर होती, किशनला खात्री होती की यावेळी नक्की मुलगी होईल. पण हाय रे देवा, यावेळी देखील मुलानेच जन्म घेतला. सातवा पुत्र ज्या दिवशी जन्मला तो वार शनिवार होता. घरातले सर्वचजण मुलगा जन्मला म्हटल्याबरोबर नाक मुरडले, आणि त्या मुलाचा तिरस्कार करू लागले. त्याच्या जन्मसोबत अनेक प्रश्न देखील जन्मास आले. मुलगी होण्याऐवजी मुलगा का जन्माला आला ? असे प्रश्न त्याच्या आईला आणि त्याला रोज विचारले जात. त्यामुळे ते दोघे खूपच कंटाळले होते.