कादंबरी - प्रेमाची जादू भाग -८ वा

  • 8.7k
  • 1
  • 4.2k

कादंबरी – प्रेमाची जादू भाग – ८ वा ---------------------------------------------- यशच्या शो-रूम पासून निघालेली मोनिका सरळ तिच्या ऑफिसमध्ये पोंचली . टेबलवरची कामे तिच्याच येण्याची वाट पाहत होती .समोरचा लेपटोप सुरु करीत तिने स्क्रीनवर आलेले मेल पाहिले , अगदी तातडीने त्यावर काही करायची गरज नाहीये, हे जाणवून ती खुर्चीत आरामशीरपणे विसावली , डोक्यात आणि मनात मात्र आजच्या दिवसाची झालेली छान सुरुवात घोळत आहे, हे तिला जाणवत होते. अंजलीवहिनीनी तिच्या मावशीला हे यशचे स्थळ सुचवले ..आणि मावशीने दम दिला .. म्हणून नाईलाजाने आपण तयार झालोत ..पण, आता यशला भेटून आल्यावर असे वाटते आहे “यार , सोचा था हमने , उतना तो बुरा नही