लेडीज ओन्ली - 4

  • 8k
  • 3.1k

|| लेडीज ओन्ली ||{ भाग - ४} [ लेडीज ओन्ली या कथामालिका कादंबरीतील सर्व घटना आणि पात्र काल्पनिक आहेत. त्यांचा वास्तवाशी संबंध आढळून आल्यास तो केवळ योगायोग समजावा. लेडीज ओन्ली या कथामालिका कादंबरीच्या संदर्भातील सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.] " लेडीज ओन्ली - ( 4 ) "'टिंगटाँग..' दारावरची बेल वाजली. "आलं माझं बछडू", असं म्हणत विजयाताई ताडकन उठून दरवाजाच्या दिशेने झेपावल्या. घाईनेच कडी सरकवली. दार उघडलं. समोर एक पन्नाशीतली दांडग्या शरीरयष्टीची बाई उभी होती. "राधाबाई.. तुम्ही आहात होय.. " अपेक्षाभंग झाल्यागत विजयाताई बोलल्या. " म्हंजी.. दुसरं कोण येणार व्हतं या टायमाला? मार्निंगचे सात मंजी माझाच ड्युटी टायम न वं?" राधाबाई. या घरात धुणी