मायाजाल - २५

(15)
  • 9k
  • 4.8k

मायाजाल---२५ त्या दिवशी रात्रीपर्यंत हर्षद मृदुलाकडे राहिला. रमाकाकू स्वयंपाक करून गेल्या. मृदुलाने हर्षदसाठीही जेवण बनवायला सांगितलं होतं. तिचा भाऊ कुणाल ताईच्या आजारपणामुळे थोडा घाबरलेला होता, त्याचा चेहरा उतरला होता. पण हर्षदशी त्याची लगेच गट्टी जमली आणि त्याला शाळेच्या गमती जमती सांगताना त्याचा चेहरा खुलला होता. जेवताना हर्षद हसत म्हणाला, " मी मोठा जादुगार आहे; बरं का! बघ तुझ्या ताईला जादूने लगेच कसं बरं करतो