कादंबरी- जिवलगा -भाग - ४० वा

  • 13.1k
  • 1
  • 6.6k

कादंबरी – जिवलगा बाग -४० वा --------------------------------------------------- माणसाच्या स्वभावाची एक गंमत असते ..’त्याच्या मनातल्या ..त्याने ठरवून ठेवलेल्या गोष्टी ज्या अगदी स्वप्नवत वाटणाऱ्या असतात ,..’ नेमक्या अशा गोष्टी कितीही ठरवून ठेवलेल्या असल्या तरी त्या पूर्ण होण्यासाठी ..त्या पूर्ण करण्यासाठी आपल्या मोठ्या माणसांची ,त्यांच्या परवानगीची गरज असते कारण या अशा गोष्टींना एक विशेष असे सामाजिक स्थान असते. तुमच्या लक्षात आले असेल ..त्य गोष्टी म्हणजे ’लग्न , विवाह ,या संदर्भात आहेत . या गोष्टी आपल्या एकट्याच्या इच्छे-प्रमाणे करताच येत नाहीत असे नाही. त्यासाठी बहुतेक वेळा विरोध होत असतो , त्या विरोधाला न जुमानता आपल्या मना प्रमाणे लग्न करणारे आपण पाहत असतो , या