सगळीकडे कोरोना, कोरोना आणि कोरोना. थैमान घातला होता राव या रोगाने. असेच एका दिवशी रात्री सहा-सहा फुट अंतर ठेऊन गप्पा मारत बसलो होतो. आपल्याला पुर्वीसारखे मनसोक्त जगता येईल का? या विषयावर परिसंवाद चालला होता. कुणी म्हणत होतं की निसर्गाने मानवाला चांगला धडा शिकवला आहे, कुणी म्हणत होत की आता काही पूर्वीसारखं नाही जगता येणार, बंधांनातच राहावं लागेल वगैरे. इतक्यात डॉक्टर घोलप आले. ते आमच्यात बर्यापैकी सीनियर. त्यामुळे त्यांच्याविषयी एक आदरयुक्त भीती सर्वांच्याच मनात असायची. त्यांचा व्यासंग फार मोठा. त्यामुळे बोलताना ते अशी काही उदाहरणं द्यायचे किंवा अशी अगम्य भाषा वापरायचे की समोरचा अगदी मंत्रमुग्ध होऊन जयचा. आज त्यांनी कोरोना विषयी