कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .भाग- २५ वा

  • 7.1k
  • 2.4k

कादंबरी –प्रेमाविण व्यर्थ हे जीवन भाग- २५ वा -------------------------------------------------------------------------- अजयजीजू आणि रंजनादीदी यांचा कार्यक्रम कल्पनेपेक्षा जास्त छान पार पडला ,याचे भरभरून समाधान मिळवता आल्याचा आनंद अनुशाच्या मनाला होत होता . त्यात जास्त कौतुकास्पद असा भाग ..ठरला होता तो. अजयसरांनी केलेला कॉलेजातील माणसांचा गौरव. पाहुणे निघून गेल्यावर प्रिन्सिपलसरांनी त्यांच्या भावना .अनुशाला सांगतांना म्हटले - अनुशा ..हा कार्यक्रम आयोजित करण्याचा तुझा उद्देश ..वेगळा आहे, हे मला माहिती आहे . तो किती सफल झाला आणि तो किती सफल होईल ..? याचे उत्तर तर तुला हा कार्यक्रम सागर देशमुख पाहतील तेव्हांच कळेल , पण, माझ्या भावना तुला सांगतो .. अनुषा -तसे पाहिले तर.