९) सौभाग्य व ती ! बाळूच्या लग्नाला निघालेल्या नयनची बस तिचे सासर सोडून माहेराकडे धावत असताना गावाशेजारी असलेली नदी नयनच्या दृष्टीस पडली. नदीचे पाणी कसे उत्साहाने, वेगाने खळाळ करीत वेगळ्याच ओढीने सागराकडे धावत होते. नयनच्या मनातील विचारही त्याच वेगाने धावत होते... 'निघताना विठाबाईला सांगायला पाहिजे होतं. तिला तस न सांगता मी निघून आले हे बरोबर झालं नाही. विठा किती जीव लावते आम्हा दोघींवर! खरेच लक्षातच आले नाही पण ती वेळ तशीच होती. खरे तर सदाला प्रभाच्या मिठीत