लेडीज ओन्ली - 3

  • 8.2k
  • 4k

|| लेडीज ओन्ली ||( भाग - तीन) { लेडीज ओन्ली या कथामालिका कादंबरीतील सर्व घटना आणि पात्र काल्पनिक आहेत. त्यांचा वास्तवाशी संबंध आढळून आल्यास तो केवळ योगायोग समजावा. लेडीज ओन्ली या कथामालिका कादंबरीच्या संदर्भातील सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.} || लेडीज ओन्ली - 3 ||'ट्रिरिंग... ट्रिरिंग.. ट्रिरिंग.. ' विजयाताईंचा मोबाईल बराच वेळ खणखणत होता. कानाला तो कर्कश्श आवाज अगदीच असह्य झाला तेव्हा त्यांनी डोळे उघडले. कॉटच्या बाजूच्या स्टुलावर पडल्या पडल्या भणभणणारा मोबाईल हातात घेताना 'इतक्या पहाटे कुणाला आठवण झाली?' असं मनाशीच पुटपुटल्या. उशीजवळ ठेवलेला चष्मा डोळ्यांवर चढवला अन् मोबाईलच्या स्क्रीन वर नजर फिरवली. 'बछडी' असं नाव दिसलं अन् विजयाताईंचा