कादंबरी- जिवलगा ...भाग - ३९ वा

(13)
  • 13.1k
  • 6.4k

कादंबरी –जिवलग भाग – ३९ वा --------------------------------------------------------------------------- संध्याकाळचे पाच वाजत आलेले होते , दिवसभर फिरून घरी आल्यामुळे ,नेहा आणि सोनिया दोघीजणी अगदी निवांत बसल्या होत्या ,हातातल्या फोनमध्ये लक्ष होते ,पण, मन मात्र अजिबात नव्हते . नेहाच्या मनात एकच विचार ..हेमूने मेसेज तरी दायला हवा , काय चालू आहे, वातावरण टेंशनचे असले म्हणून फोन करता येणार नाही ,हे समजून घेऊ एक वेळ ..पण,मेसेज करता येतात या गोष्टीचा हेमुला विसर पडलाय की काय ? शेवटी न राहवून ..नेहाने हेमुला मेसेज केला .. त्याचे उत्तर हेमूने दिले तर ठीकच .. नाही तर, तिकडे काय चालू असेल ? याच विचारात बसून राहायचे , याशिवाय