जिद्द

  • 7.9k
  • 1.7k

प्रकाश हा अभ्यासू, कष्टाळू आणि जिद्दी तरुण. जीवनात त्याने अनेक कष्ट, यातना आणि संकटांना तोंड दिले पण हार पत्करली नाही. तो लहान असतांनाच त्याचे वडील त्याला सोडून देवाघरी गेले. त्यावेळी प्रकाशला काही कळत देखील नव्हते. छोट्याशा गावात तो आईसोबत राहत होता. शेती तर नव्हतीच होतं एक घर ते ही झोपडीच. आई दुसऱ्याच्या शेतीत मोलमजुरी करून कसेबसे दिवस काढत असे. प्रकाश शाळेला जाऊ लागला, त्याची हुशारी आणि कष्टाळूवृत्ती शाळेच्या अभ्यासात दिसून येऊ लागली. एकेक वर्ष संपत जात होते. वर्ग वाढत होते तसे त्याच्या समोर अनेक संकटे उभे राहू लागले. गावात सातवी पर्यंतची शाळा होती तोपर्यंत शिक्षण घेणे सोपे गेले मात्र आठव्या