४) पवनला हॉस्पिटलला नेणे...गडाच्या पायथ्याशी एक मंदिर बसलं आहे.कालांतराने गड जेव्हा फॉरेस्टच्या हद्दीमध्ये गेलं, तेव्हा खाली असलेली दोन ते तीन एकर तेवढीच जागा फक्त देवस्थानच्या नावे राहिली.आणि तिथे रखवालदार फक्त एक माणूस राहतो.सकाळी रोजच्यासारखा तो जेव्हा झोपून उठला, तेव्हा रोजच्याप्रमाणे त्याने फेरफटका मारण्यास सुरुवात केली. अचानक गडाच्या प्रवेशद्वारापाशी, त्याला मी निपचित पडलेला आढळून आलो.तो घाबरत घाबरत माझ्यापाशी आला. डोक्यातून आणि गुडघ्यातून घरंगळत आल्यामुळे थोडेफार रक्तसंचार होऊ लागले होते. आधी त्याने मला पालथ्या पडलेल्या स्थितीतून सरळ केले. आणि मी जिवंत आहे की मेलो आहे याची जाणीव केली.अत्यंत कमी प्रमाणात माझा श्वासोच्छवास चालू होता. त्यामुळे त्याला जरा हायसे वाटले. आणि